केंद्रीय कार्यकारी मंडळ (राष्ट्रपती + प्रधानमंत्री + मंत्रिमंडळ)
- राष्ट्रपती: सर्वोच्च राष्ट्रप्रमुख व नामधारी संविधानात्मक प्रमुख; तर प्रधानमंत्री हे कार्यकारी प्रमुख (वास्तव सत्ता) असतात.
- निवड व पात्रता: भारतीय जनतेकडून अप्रत्यक्षरीत्या निवड (संसद सदस्य + विधानसभा सदस्य यांच्या निर्वाचन मंडळाकडून). भारतीय नागरिक व वय ३५ वर्षे पूर्ण; कार्यकाल ५ वर्षे.
- महाभियोग प्रक्रिया: राष्ट्रपतींकडून संविधानाचा भंग झाल्यास एक सभागृह आरोप ठेवते व दुसरे चौकशी करते; दोन्ही सभागृहांच्या विशेष (२/३) बहुमताने ठराव संमत झाल्यास राष्ट्रपती पदावरून दूर होतात.
राष्ट्रपतींची ७ प्रमुख कार्ये व अधिकार
- संसदेचे अधिवेशन बोलावणे, स्थगित करणे, लोकसभा बरखास्त करणे.
- विधेयकावर स्वाक्षरी (स्वाक्षरीशिवाय कायदा होत नाही).
- प्रधानमंत्री, मंत्री, सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राज्यपाल व मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक करणे.
- संरक्षण दलांचे सर्वोच्च प्रमुख (युद्ध व शांतता निर्णय).
- न्यायालयीन अधिकार: शिक्षा कमी करणे, तीव्रता कमी करणे किंवा रद्द करणे (दया अधिकार).
- तीन प्रकारच्या आणीबाणी जाहीर करणे: (१) राष्ट्रीय आणीबाणी, (२) घटक राज्यांतील आणीबाणी (राष्ट्रपती राजवट), (३) आर्थिक आणीबाणी.
- राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत उपराष्ट्रपती कामे पाहतात (निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांकडून).
