भारतातील न्यायव्यवस्थेची रचना (एकात्म स्वरूप)
भारत संघराज्य असले तरी न्यायमंडळ मात्र संपूर्ण देशासाठी एकच (एकात्म) आहे:
- सर्वोच्च पातळी: भारताचे सर्वोच्च न्यायालय (नवी दिल्ली; प्रमुख: सरन्यायाधीश).
- मध्यम पातळी: उच्च न्यायालये (सध्या देशात २४ उच्च न्यायालये; उदा. मुंबई उच्च न्यायालय महाराष्ट्र, गोवा, दादरा-नगर हवेली व दीव-दमणसाठी आहे).
- स्थानिक पातळी: जिल्हा न्यायालये (जिल्हा न्यायाधीश) व दुय्यम (तालुका) न्यायालये.
न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्यासाठी संविधानातील तरतुदी
- नेमणूक: सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात (राजकीय दबाव टळतो).
- सेवा शाश्वती: क्षुल्लक कारणासाठी पदावरून दूर करता येत नाही (फक्त संसदेत महाभियोग प्रक्रियेनेच).
- सेवानिवृत्ती वय: सर्वोच्च न्यायालय = ६५ वर्षे; उच्च न्यायालय = ६२ वर्षे.
- वेतन: भारताच्या संचित निधीतून दिले जाते (संसदेत चर्चा होत नाही).
- न्यायालयाचा अवमान: निर्णयांवर व्यक्तिगत टीका करता येत नाही; अवमान करणे हा गुन्हा आहे.
