युरोपातील प्रबोधनयुग (१३ वे ते १६ वे शतक)
मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात युरोपात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध यांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला.
- मानवतावाद: धर्माऐवजी माणूस सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला.
- लिओनार्दो-द-विंची: प्रबोधनकाळातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व; ‘मोनालिसा’ व ‘द लास्ट सपर’ या अजरामर चित्राकृती.
- छपाई यंत्र (इ.स. १४५०): जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने शोध लावला, ज्यामुळे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचले.
- धर्मसुधारणा चळवळ: रोमन कॅथलिक चर्चच्या कर्मकांडांविरुद्ध आवाज उठवून बुद्धिप्रामाण्य व धार्मिक स्वातंत्र्याला महत्त्व दिले गेले.
भौगोलिक शोध व सागरी मार्ग
इ.स. १४५३ मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपल (इस्तंबूल) जिंकून आशियाकडे जाणारे खुश्कीचे व्यापारी मार्ग बंद केले. त्यामुळे युरोपियांनी नवे जलमार्ग शोधले:
- इ.स. १४८७ (बार्थोलोम्यू डायस): पोर्तुगीज खलाशी आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत (केप ऑफ गुड होप) पोहोचला.
- इ.स. १४९२ (ख्रिस्तोफर कोलंबस): पश्चिमेकडे जाऊन भारताचा शोध घेण्याच्या प्रयत्नात अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला.
- इ.स. १४९८ (वास्को-द-गामा): पोर्तुगीज खलाशी आफ्रिकेला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहोचला!
