गांधीयुग (१९२० ते १९४७) व सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान
- १८९३ मध्ये महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत गेले व तेथील हिंदी लोकांना सत्याग्रहाने न्याय मिळवून दिला.
- ९ जानेवारी १९१५: गांधीजी भारतात परतले; गोपाळ कृष्ण गोखल्यांच्या सल्ल्याने देशभर दौरा करून साबरमती आश्रमात राहिले.
- सत्याग्रह: सत्य व अहिंसेच्या मार्गाने अन्याय करणाऱ्याचे मतपरिवर्तन करणे (मार्टिन ल्यूथर किंग व नेल्सन मंडेला यांवरही याचा प्रभाव पडला).
तीन यशस्वी प्रारंभिक लढे
- चंपारण्य सत्याग्रह (१९१७, बिहार): नीळ पिकवण्याच्या सक्तीविरुद्ध गांधीजींचा भारतातील पहिला यशस्वी लढा.
- खेडा सत्याग्रह (१९१८, गुजरात): दुष्काळातही सक्तीच्या शेतसाऱ्याविरुद्ध साराबंदीची चळवळ; सरकारने सारा माफ केला.
- अहमदाबादचा कामगार लढा: गिरणी कामगारांच्या वेतनवाढीसाठी गांधीजींनी उपोषण केले; कामगारांना वेतनवाढ मिळाली.
रौलट कायदा व जालियनवाला बाग हत्याकांड (१९१९)
- १७ मार्च १९१९ (रौलट कायदा): सर सिडनी रौलट यांच्या समितीवरून विनाचौकशी अटक व अपील नसलेला ‘काळा कायदा’ केला गेला.
- १३ एप्रिल १९१९ (जालियनवाला बाग, अमृतसर): डॉ. सत्यपाल व सैफुद्दीन किचलु यांच्या अटकेच्या निषेधार्थ बैसाखीच्या दिवशी भरलेल्या शांततापूर्ण सभेवर जनरल डायरने १६०० फैरी झाडल्या (चारशे लोक ठार; जबाबदार गव्हर्नर मायकेल ओडवायर).
- निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी ‘सर’ किताबाचा त्याग केला; सरकारने हंटर कमिशन नेमले.
