दांडी यात्रा (१२ मार्च ते ६ एप्रिल १९३०)
- मिठावरील कर रद्द करण्यासाठी गांधीजींनी १२ मार्च १९३० रोजी ७८ सहकाऱ्यांसह साबरमती आश्रमातून दांडी येथे ३८५ किमी पदयात्रा सुरू केली.
- ५ एप्रिल: दांडी येथे पोहोचले; ६ एप्रिल १९३०: दांडीच्या समुद्रकिनाऱ्यावर मीठ उचलून मिठाचा कायदा मोडला व सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली!
देशव्यापी सत्याग्रह व बलिदान
- पेशावर (२३ एप्रिल १९३०): ‘सरहद्द गांधी’ खान अब्दुल गफारखान यांनी ‘खुदा-इ-खिदमतगार’ संघटनेमार्फत सत्याग्रह केला. गढवाल पलटणीचे अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबार करण्यास नकार दिला!
- सोलापूर (६ मे १९३०): गिरणी कामगार आघाडीवर होते; सरकारने मार्शल लॉ जारी केला. मल्लाप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन व जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आले.
- धारासना (गुजरात): सरोजिनी नायडू यांच्या नेतृत्वाखाली अहिंसक मिठाचा सत्याग्रह झाला. महाराष्ट्रात वडाळा, मालवण, शिरोडा येथे मिठाचे तर बिळाशी, संगमनेर, कळवण, चिरनेर, पुसद येथे जंगल सत्याग्रह झाले.
- बाबू गेनू सैद: मुंबईत परदेशी माल नेणाऱ्या ट्रकसमोर आडवे पडून बाबू गेनूंनी हौतात्म्य पत्करले!
