१९३५ चा कायदा, प्रांतिक मंत्रिमंडळे व दुसरे महायुद्ध
- १९३५ चा कायदा: संघराज्याची तरतूद संस्थानिकांच्या नकारामुळे अमलात आली नाही, पण १९३७ मध्ये ११ पैकी ८ प्रांतांत राष्ट्रीय सभेची मंत्रिमंडळे सत्तेवर आली.
- १९३९: इंग्लंडने भारतीयांना न विचारता भारताला दुसऱ्या महायुद्धात सामील केल्याने नोव्हेंबर १९३९ मध्ये प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले.
- वैयक्तिक सत्याग्रह: युद्धविरोधी प्रचारासाठी सामुदायिक नव्हे तर एकेका व्यक्तीने कायदेभंग करण्याचे ठरले; आचार्य विनोबा भावे पहिले सत्याग्रही होते (नंतर २५ हजार सत्याग्रहींनी तुरुंगवास भोगला).
- क्रिप्स योजना (मार्च १९४२): चर्चिलने स्टॅफर्ड क्रिप्सना पाठवले, पण पूर्ण स्वातंत्र्याचा उल्लेख नसल्याने काँग्रेसने व पाकिस्तान नसल्याने मुस्लीम लीगने ती फेटाळली.
‘छोडो भारत’ आंदोलन (ऑगस्ट क्रांती, १९४२)
- ७–८ ऑगस्ट १९४२: मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर (क्रांती मैदान) मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली पं. नेहरूंनी मांडलेला ‘छोडो भारत’ ठराव मंजूर झाला.
- गांधीजींनी जनतेला ‘करेंगे या मरेंगे’ असा स्फूर्तिदायक मंत्र दिला.
- बालवीरांची गाथा: नंदूरबार येथे तिरंगा घेऊन मिरवणूक काढणाऱ्या शिरीषकुमार, लालदास, धनसुखलाल, शशिधर, घनश्याम या शाळकरी विद्यार्थ्यांनी गोळीबारात हौतात्म्य पत्करले!
