शेतकरी चळवळ
- बंगालमध्ये नीळ उत्पादकांच्या हलाखीवर दीनबंधू मित्र यांनी ‘नीलदर्पण’ नाटक लिहिले. १८७५ मध्ये महाराष्ट्रात सावकारांविरुद्ध उठाव; केरळमध्ये मोपला शेतकऱ्यांचा उठाव.
- १९१८: उत्तर प्रदेशात बाबा रामचंद्र यांनी ‘किसान सभा’ स्थापली.
- १९३६: प्रा. एन. जी. रंगा यांच्या पुढाकाराने ‘अखिल भारतीय किसान सभा’ स्थापन (अध्यक्ष: स्वामी सहजानंद सरस्वती); महाराष्ट्रात फैजपूर येथे ग्रामीण भागातील पहिले राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले.
- १९३८: पूर्व खानदेशात अतिवृष्टीनंतर शेतसारा माफीसाठी साने गुरुजींनी मोर्चे काढले; अमळनेर गिरणी कामगार युनियनचे ते अध्यक्ष होते व पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले व्हावे म्हणून त्यांनी आमरण उपोषण केले!
कामगार व समाजवादी चळवळ
- नारायण मेघाजी लोखंडे (‘भारतीय कामगार चळवळीचे जनक’): १८९० मध्ये बाँबे मिल हँड्स असोसिएशन स्थापली; त्यांच्या प्रयत्नामुळे १० जून १८९० पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळाली!
- १९२० (आयटक - AITUC): ना. म. जोशी यांचा मोठा वाटा; पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपतराय.
- १९२५: भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना (श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद — ब्रिटिशांनी त्यांच्यावर ‘मीरत कट खटला’ चालवला).
- १९३४ (काँग्रेस समाजवादी पक्ष): नाशिकच्या तुरुंगात आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, मिनू मसानी, डॉ. राममनोहर लोहिया यांनी निर्णय घेऊन स्थापना केली.
