पार्श्वभूमी व संयुक्त महाराष्ट्र परिषद (१९४६)
- १९११ मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्यावर न. चिं. केळकर व लोकमान्य टिळक (१९१५) यांनी मराठी भाषिकांच्या एका प्रांताचा विचार मांडला.
- १२ मे १९४६: बेळगाव साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा ठराव संमत झाला.
- २८ जुलै १९४६: मुंबईत शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली ‘महाराष्ट्र एकीकरण परिषद’ भरली.
विविध आयोग व नागपूर करार
- दार कमिशन (१७ जून १९४८): डॉ. राजेंद्रप्रसादांनी न्यायाधीश एस. के. दार यांच्या अध्यक्षतेखाली नेमले; प्रश्न सुटला नाही.
- जे.व्ही.पी. समिती (२९ डिसेंबर १९४८): पं. जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टाभिसितारामय्या यांनी भाषावार प्रांतरचना तत्त्वतः मान्य केली पण योग्य वेळ नसल्याचे म्हटले. आचार्य अत्रे यांनी मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव ५० विरुद्ध ३५ मतांनी मंजूर करून घेतला!
- राज्य पुनर्रचना आयोग (२९ डिसेंबर १९५३): न्यायमूर्ती एस. फाजल अली अध्यक्ष; मुंबईचे द्विभाषिक राज्य सुचवले.
- नागपूर करार (१९५३): पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यासह संयुक्त महाराष्ट्रासाठी करार (संविधान कलम ३७१ (२) व नागपुरात वार्षिक हिवाळी अधिवेशन).
