प्रकरण १ — स्टेज १: जैवविविधता व व्हिटाकरची पंचसृष्टी पद्धती

१. जैविक वर्गीकरण का आवश्यक आहे?
२०११ च्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यांत सुमारे ८७ दशलक्ष सजीव जाती ज्ञात आहेत. एवढ्या प्रचंड सजीवांचा अभ्यास सुलभ करण्यासाठी त्यांच्यातील साम्य व फरकांवर आधारित गट व उपगट बनविण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण (Biological Classification) म्हणतात.
वर्गीकरणाचा थोडक्यात इतिहास:
- १७३५ (कार्ल लिनिअस): २ सृष्टी (वनस्पती व प्राणी)
- १८६६ (हेकेल): ३ सृष्टी (प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी)
- १९२५ (चॅटन): २ गट (आदिकेंद्रकी व दृश्यकेंद्रकी)
- १९३८ (कोपलँड): ४ सृष्टी (मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती, प्राणी)
- १९६९ (रॉबर्ट हार्डींग व्हिटाकर): पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती (आजही सर्वाधिक प्रमाण मानली जाते).
२. व्हिटाकर यांचे ५ वर्गीकरण निकष
- पेशीची जटिलता: आदिकेंद्रकी (Prokaryotic) व दृश्यकेंद्रकी (Eukaryotic).
- सजीवांचा प्रकार: एकपेशीय किंवा बहुपेशीय.
- पोषणाचा प्रकार: स्वयंपोषी (वनस्पती - प्रकाशसंश्लेषण), परपोषी-मृतोपजीवी (कवके - शोषण), परपोषी (प्राणी - भक्षण).
- जीवनपद्धती: उत्पादक (वनस्पती), भक्षक (प्राणी), विघटक (कवके).
- वर्गानुवंशिक संबंध: आदिकेंद्रकी ते दृश्यकेंद्रकी, एकपेशीय ते बहुपेशीय.