प्रकरण ९ — स्टेज १: भूकंप (Earthquake)

१. भूकंपाची संज्ञा व मापन
- भूकंपनाभीच्या अगदी वर भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू (Epicentre) म्हणतात (तेथे हानी सर्वाधिक).
- पृथ्वीवर वर्षाला सुमारे १२,४०० ते १४,००० भूकंप होतात (सौम्य भूकंप जास्त).
- भूकंपमापक यंत्र: सेस्मोग्राफ / सेस्मोमीटर; तीव्रता मोजण्याचे गणिती एकक: रिश्टर स्केल.
- पूर्वसूचना साधने: लेसर रेंजिंग, गायगर कौंटर, क्रीप मीटर, स्ट्रेन मीटर, टिल्ट मीटर, टाइड गेज.
२. भूकंपरोधक इमारती व दक्षता
- भारतीय मानक संस्थेचे कोड: IS 456, IS 1893, IS 13920 (पाया बाकीच्या भूभागापासून वेगळा केलेला असतो).
- घरात असताना: टेबल/पलंगाखाली आश्रय घ्या किंवा कोपऱ्यात बसून गुडघ्यांभोवती हात ठेवून चेहरा झाका.
- बाहेर/वाहनात: वाहन थांबवून आतच राहा; झाडे, विजेच्या तारा, इमारतींपासून दूर राहा.
- करू नका: लिफ्ट वापरू नका, मेणबत्ती/काड्यापेटी वापरू नका (मेन स्वीच बंद करा व टॉर्च वापरा).
कार्य संस्थांचे: राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था (NCS) भू-विज्ञान मंत्रालयांतर्गत कार्य करते.