प्रकरण १६ — स्टेज १: प्रकाशाचे परावर्तन व ३ नियम

१. परावर्तनाशी संबंधित संज्ञा
- आपाती किरण ($AO$): पृष्ठभागावर पडणारा प्रकाशकिरण.
- आपात बिंदू ($O$): ज्या बिंदूवर आपाती किरण पृष्ठभागाला स्पर्श करतो.
- परावर्तित किरण ($OB$): पृष्ठभागावरून परत फिरणारा किरण.
- स्तंभिका ($ON$): आपात बिंदू $O$ वर आरशास $90^\circ$ कोन करणारी लंब रेषा ($\angle PON = \angle QON = 90^\circ$).
- आपतन कोन ($\angle i = \angle AON$): आपाती किरण व स्तंभिका यांमधील कोन.
- परावर्तन कोन ($\angle r = \angle BON$): परावर्तित किरण व स्तंभिका यांमधील कोन.
२. प्रकाश परावर्तनाचे ३ नियम
- आपतन कोन ($\angle i$) व परावर्तन कोन ($\angle r$) समान मापाचे असतात ($\angle i = \angle r$).
- आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात.
- आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात.