प्रकरण १७ — स्टेज १: प्लॅस्टिक व त्याचे प्रकार

१. प्लॅस्टिक (Plastic)
आकार्यता गुणधर्म असणारे व सेंद्रिय बहुवारिकांपासून बनवलेले मानवनिर्मित पदार्थ म्हणजे प्लॅस्टिक. (२००० पेक्षा जास्त प्रकार; गंजत नाही, अविघटनशील, उष्णता व विजेचे दुर्वाहक).
| प्रकार | थर्मोप्लॅस्टिक (उष्मामृदू) | थर्मोसेटिंग (उष्मादृढ) |

| वैशिष्ट्य | उष्णतेने पुन्हा हवा तसा आकार देता येतो | एकदा साच्यात आकार दिल्यावर पुन्हा बदलता येत नाही |
| उदाहरणे व उपयोग | १. PVC: बाटल्या, रेनकोट, पाईप, तारांचे आवरण
२. पॉलीस्टायरीन (PS): फ्रीजचे भाग, सीडी कव्हर
३. पॉलीइथिलीन (PE): दुधाच्या पिशव्या, गार्डन पाईप
४. पॉलीप्रोपिलीन (PP): चटया, दोरखंड, प्रयोगशाळा उपकरणे | १. बॅकेलाईट: इलेक्ट्रिक स्विच, कुकरचे हँडल
२. मेलेमाईन: कपबश्या, प्लेट्स, अग्निरोधक/ध्वनिरोधक
३. पॉलीयुरेथेन: सर्फबोर्ड, सीट्स
४. पॉलीइस्टर: तंतूकाच, लेझर टोनर, कापड |
(वाहनांवर ओरखड्यांपासून संरक्षणासाठी टेफ्लॉन कोटिंग करतात; भिंगे व कृत्रिम दात पॉलीॲक्रेलिक पासून बनवतात.)