प्रकरण १८ — स्टेज १: परिसंस्था, घटक व निश

१. परिसंस्था (Ecosystem) म्हणजे काय?
- सजीव (जैविक / Biotic) व निर्जीव (अजैविक / Abiotic) घटक आणि त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया यांतून निर्माण होणारा आकृतीबंध म्हणजे परिसंस्था.
- शब्द इतिहास: १९३० मध्ये रॉय क्लॅफाम यांनी शब्द सुचवला; १९३५ मध्ये ए. जी. टान्सले यांनी प्रचारात आणला.
- निश (Niche): परिसंस्थेतील सजीवाचे इतर सजीवांच्या संदर्भातील स्थान व तो बजावत असलेली विशिष्ट भूमिका.
२. परिसंस्थेचे घटक
- अजैविक घटक:
- भौतिक: हवा, पाणी, बाष्प, खनिजे, मृदा, सूर्यप्रकाश.
- रासायनिक: असेंद्रिय ($H, O, N, Ca, Fe, Na, K$) व सेंद्रिय (प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ).
- जैविक घटक:
- उत्पादक (स्वयंपोषी): हिरव्या वनस्पती.
- भक्षक (परपोषी): प्राणी (प्राथमिक, द्वितीय व तृतीय भक्षक; मानव भक्षक गटात मोडतो).
- विघटक: सूक्ष्मजीव (मृत सेंद्रिय पदार्थांचे असेंद्रिय पोषक द्रव्यांत रूपांतर करून पुनर्चक्रीकरण करतात).